निगडीत पादचारी महिलेच्या पर्ससह २३ हजारांचा ऐवज चोरट्याने केला लंपास

144

निगडी, दि. १३ (पीसीबी) – रस्त्याने पायी घरी निघालेल्या एका महिलेची पर्स मागून दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसका मारुण चोरु नेली. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील हॉटेल सुखशांतीसमोर घडली.

साधना संजय दातार (वय ५२, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साधना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास प्राधिकरण मधील सुखशांती हॉटेल समोरील रस्त्यावरून पायी जात होत्या. यावेळी अचानक मागून दुचाकीवरुन आलेल्या एका चोरट्याने साधना यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेली. पर्समध्ये २२ हजार रुपये रोख आणि १ हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण २३ हजारांचा ऐवज होता. निगडी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.