निगडीत पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेल्याच्या रागातून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

302

निगडी, दि. २५ (पीसीबी) – पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेल्याच्या रागातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. २४) सकाळी अकराच्या सुमारास निगडीतील अजंठानगर येथून  उघडकीस आली.

युवराज मोहन मोहिते (वय ४२, रा. अजंठानगर, निगडी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज आणि त्यांच्या पत्नीचे शनिवारी (दि.२३) संध्याकाळी जोराचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन युवराजने त्यांच्या मुलीला बेदम मारहाण केली. ही माहिती युवराजच्या सासरकडच्या मंडळींना कळाली. यामुळे युवराजच्या मेहुण्याने बहीण आणि भाचीला निगडीतीलच आपल्या घरी नेले. बायको माहेरी गेल्याने युवराज खूपच संतापला आणि त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी उशिरापर्यंत युवराज कामावर गेला नाही, त्यामुळे त्याचे कामातील काही सहकारी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.