निगडीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

854

निगडी, दि. ५ (पीसीबी) – देहुरोडहून निगडीच्या दिशेने येणारी एका भरधाव दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात निगडी जकात नाक्याजवळ मंगळवारी (दि.४) दुपारी तीनच्या सुमारास झाला.

प्रशांत कांबळे (वय ४४, रा. मुरबाड रोड, कल्याण) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मयत प्रशांत देहूरोडहून निगडीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरुन वेगाने जात होता. यावेळी अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि  दुचाकी घसरुन फरफटत लांबपर्यंत गेली. यामध्ये प्रशांत गंभीर जखमी झाला.  त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.