निगडीत दुकानाचे शटर उचकटून ६० हजारांची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

141

निगडी, दि. १५ (पीसीबी) – कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमधील ५० हजारांची रोख आणि १० हजारांची सोन्याची अंगठी असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना रविवारी (दि.१४) रात्री साडेचार ते पाचच्या दरम्यान “डिलक्स फॅशन” मयुर समृध्दी बिल्डींग ए विंग शॉप क्र. ५ येथे घडली.

याप्रकरणी दुकानाचे मालक जोगराज लिखमसिंग राजपुरोहित (वय २२, रा. जाधव पार्क, रुम नं.३, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा साडेचार ते पाचच्या दरम्यान निगडी येथील “डिलक्स फॅशन” या कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दोन अज्ञात चोरटे दुकानात शिरले. तसेच दुकानातील ड्रॉवरमधील ५० हजारांची रोख आणि १० हजारांची सोन्याची अंगठी असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. निगडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.