निगडीत दिवसाढवळ्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबवीले पावनेतीन लाखांचे दागिने

276

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – दिवसाढवळ्या एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले तब्बल पावनेतीन लाखांचे दागिने चोरट्यांनी चोरु नेल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी मंगळवार (दि.५) सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान निगडी प्राधिकरण येथील सेक्टर नं.२७, व्हिला बिल्डींग फ्लॅट नं.४ येथे झाली.

याप्रकरणी फ्लॅट मालक विजयकुमार अनंतपुर (वय ५४, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार यांचा निगडी प्राधिकरण येथील सेक्टर नं.२७, व्हिला बिल्डींगमध्ये स्वत: च्या नावचा फ्लॅट आहे. मंगळवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावू ते बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले २ लाख ४९ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. फिर्यादी विजयकुमार हे सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.