निगडीत ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून पावनेतीन लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

203

निगडी, दि. २९ (पीसीबी) – ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल पावनेतीन लाख रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना शनिवरी (दि.२८) रात्री उशीरा निगडीतील टिळक चौकात असलेल्या चंदन ज्वेलर्सच्या या दुकानात घडली.

याप्रकरणी चंदन ज्वेलर्सचे मालक आशिष सिरोया यांनी निगडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी काही अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी आशिष यांच्या मालकिचे निगडीतील चंदन ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत दुकानातील ३ किलो ८०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दुकानातील ड्रॉव्हर मधीला काही रोख रक्कम असा एकूण २ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. निगडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, दुकानातील सीसीटीव्ही बंद असल्याने आरोपींची ओळख पटण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे निगडी पोलिस परिसरातील इतर सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच परिसरातील काही रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.