निगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास

223

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ६२ हजार रुपये चोरुन नेले. ही घटना बुधवार (दि.१५) रात्रीच्या सुमारास श्रीराम कृष्णा विहार अप्पूघर येथे घडली.

याप्रकरणी घरमालक त्रिलोकचंद रेवाचंद पंजाबी (वय ५१, रा. श्रीराम कृष्णा विहार, अप्पूघर) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्रिलोकचंद पंजाबी यांच्या मालकीचे अप्पूघर येथील घराचे अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून रोख रक्कम ६२ हजार रुपये चोरुन नेले. याप्रकरणी घरमालक त्रिलोकचंद पंजाबी यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.