निगडीत एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

389

निगडी, दि. २५ (पीसीबी) – एका एसटी बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ रविवारी (दि.२४) पहाटे तीनच्या सुमारास घडली.

रवींद्र प्रमोद आहेर (वय २९, रा. पूर्णानगर, चिंचवड) असे एसटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालक अल्ताफखान नवाजखान पठाण (वय ३८, रा. अंबेजोगाई, बीड) याच्याविरुध्द निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे तीनच्या सुमारास रवींद्र आहेर हा तरुण भक्ती-शक्ती चौक येथील रस्ता ओलांडून पीएमपी डेपोकडे जात होता. यावेळी भरधाव वेघाने येणाऱ्या एका एसटीने रवींद्र याला जोरदार धडक दिली. या धडकेत रवींद्र याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी एसटी बसचालक अल्ताफखान पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.