निगडीत उघड्या दरवाज्यावाटे घरात प्रवेश करत चोरट्याचा पाकीट आणि मोबाईल फोनवर डल्ला

123

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील १०  हजारांची रक्कम आणि एक मोबाईल फोन चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी (दि.७) मध्यरात्री दोनच्या सुमारास चिखलीतील ताम्हाणे वस्ती येथे घडली.

याप्रकरणी जया भीमा गायकवाड (वय ४५, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांच्या घराचा दरवाजा लागत नाही. त्यामुळे त्या रात्री दरवाजा पुढे ढकलून झोपायच्या. शुक्रवारी (दि. ७) रात्री त्यांनी दरवाजा ढकलला आणि झोपी गेल्या. याचाच फायदा घेत मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरटा उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश केला. गायकवाड यांचा दहा हजारांची रक्कम असलेले पाकीट आणि एक मोबाईल फोन चोरट्याने लांबविला. निगडी पोलिस तपास करत आहेत.