निगडीतील यमुनानगरमध्ये तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल

602

निगडी, दि. २४ (पीसीबी) – निगडीतील यमुनानगरमध्ये एका २२ वर्षीय तरुणीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

निगडी पोलिसांनी त्यानुसार रमेश दादाराव जाधव (वय ३०, रा. थेरगाव) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश जाधव हा पिडीत २२ वर्षीय तरुणीचा सत्त पाठलाग करुन तिला छेडत होता. तसेच पिडीत तरुणी एके दिवशी यमुनानगर येथील एलआयसी बिल्डिंगजवळ पाणी पुरी खात असताना आरोपी रमेश याने तेथे येथून पिडीत तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रार तरुणीने निगडीत पोलिसात केली आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.