शरीरसंबंधाचे आमिष दाखवून निगडीतील तरुणाला ५४ लाखांचा गंडा

6512

निगडी, दि. ६ (पीसीबी) – निगडीतील यमुनानगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाला अज्ञात महिलेने शरीर संबंधाचे आमिष दाखवून तब्बल ५४ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला आरोपी महिलेने निगडीतील यमुनानगर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला वारंवार फोन करुन ओळख वाढवली. तसेच प्रेमाचे नाटक करुन शरीरसंबंध ठेवायला तयार असल्याचे आमिष दाखवून तसेच वडिलांच्या कॅन्सरचा बहाणा करून तरुणाकडून वेळोवेळी पेटीएम, फोन-पे, मोबी क्विक, एसबीआय व्हॅलेट आणि बँकेच्या खात्यातून असे एकूण ५३ लाख ६५ हजार रुपये उकळले. पैसे मिळाल्यानंतर महिलेने तरुणासोबत फोनवर बोलणे कमी केले. तरुणाने पैशाची मागणी  केली असता महिलेने फोन बंद करुन तरुणाची फसवणूक केली.  याप्रकरणी तरुणाने बुधवारी (दि.५) रात्री उशीरा निगडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. निगडी पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.