… नाहीतर एका सेकंदात भाजप कार्यालय आणि तुमच्या घरांवर कब्जा केला असता – ममता बॅनर्जी

199

कोलकाता, दि. १५ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुमचं नशिब चांगलं म्हणून मी शांत बसले आहे, नाहीतर एका सेकंदात दिल्लीतील भाजप कार्यालय आणि तुमच्या घरांवर कब्जा केला असता, अशा कडक शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले आहे.

मंगळवारी काढण्यात आलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या  रॅलीमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. या घटनेनंतर बॅनर्जी यांनी विद्यासागर कॉलेजमध्ये जात ईश्वरचंद्र विद्यासागर यांची प्रतिमा तोडफोड विरोधात रॅली काढण्याची घोषणा केली आहे.

अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान जाळपोळ,  फोडाफोडी आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.  याचा निषेध करत भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. यावर ममता बँनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा यांच्या विरोधात आंदोल न करायला  ते देवापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.