नाशिक साहित्य संमेलनात आयुक्त राजेश पाटील यांचे दुसरे पुस्तक प्रकाशित

87

पिंपरी दि. ०६ (पीसीबी) – पिंपरी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या प्रशासकीय अनुभवावर लिहिलेल्या पुस्तकाचे नाशिक येथील साहित्य संमेलनात प्रकाशन करण्यात आले.

” मोर ओडिशा डायरी” असे या पुस्तकाचे नाव असून पिंपरी महापालिकेत येण्यापूर्वी ओडिशा राज्यात कर्तव्यसेवेवर असताना तेथे आलेल्या प्रशासकीय अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे. आयुक्त पाटील यांनी यापूर्वी” ताई मी कलेक्टर व्हयनू” हे पुस्तक लिहिले होते. आपला जीवन संघर्ष व आयएएस होण्यापर्यंतचा सर्व प्रतिकूल प्रवास या पुस्तकात त्यांनी मांडला होता. स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या देशातील सर्व मुलामुलींसाठी हे पुस्तक रोल मॉडेल ठरले होते. या पुस्तकाचे विविध भाषेमध्ये भाषांतर होऊन त्याचा विक्रमी खप झाला होता.

नव्याने प्रकाशित झालेले” मोर ओडिशा डायरी” हे पुस्तक या राज्यात काम करत असताना आलेल्या प्रशासकीय अनुभवावर त्यांनी लिहिले आहे. एक प्रामाणिक व तत्वनिष्ठ व कठोर प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाची सुत्रे त्यांनी स्विकारली. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट व अनागोंदी कारभारानीच त्यांचे येथे स्वागत झाले. ते आल्यानंतर काही दिवसात स्थायी समिती अध्यक्षांना लाच प्रकरणात अटक झाली तर स्पर्श हॉस्पिटल घोटाळ्याने उच्छाद मांडलेला त्यांना पहायला मिळाला होता.दोन अडीच वर्षानंतर जेव्हा ते या शहरातून जातील तेव्हा खतरनाक अनुभवांच्या शहारून टाकणा-या आठवणी त्यांच्याजवळ असणार आहेत.