नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान जोरदार राडा

99

नाशिक, दि. २५ (पीसीबी) – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज (सोमवार) मतदान सुरू असताना शिवसेना व टीडीएफ या पक्षाच्या उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला. सोशल मीडियातून चुकीची माहिती दिल्याने शिवसैनिकांनी मतदान केंद्राबाहेरच टीडीफ उमेदवारांच्या समर्थकांना जोरदार मारहाण केली. शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घेतल्याचे संदेश टीडीएफचे उमेदवार प्रा. संदीप बेडसे यांच्या समर्थकांनी पसरवून शिक्षक मतदारात गैरसमज पसरविला, असा आरोप आमदार नरेंद्र दराडे यांनी केला.  

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीत विभागात एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रमु्ख्याने ५ उमेदवारांमध्ये खरी चुरस होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ५३ हजार ३३५ मतदारांनी नोंदणी केली आहे. यात ४० हजार ४१२ पुरुष तर १२ हजार ९२३ महिला मतदार आहे.

या शिक्षक मतदारांमध्ये टीडीएफ ही महत्वपूर्ण संघटना आहे. परंतु, तिच्यामध्येच फूट पडल्याने दोन उमेदवारांनी टीडीएफचा आम्हालाच पाठिंबा आहे, असे जाहीर केले. मात्र, टीडीएफचे  अध्यक्ष आणि सचिव यांनी प्रा. संदीप बेडसे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. तर भाऊसाहेब कचरे यांच्या पाठीमागे टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशहा होते.