नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव

192

नाशिक, दि. २७ (पीसीबी) – नाशिक महापालिकेचे आयुक्त  तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजप अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. त्यासाठी आज (सोमवार)  विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  मात्र, भाजपमधील एका गटाने या अविश्वास ठरावाला विरोध केला आहे.  

करवाढीच्या मुद्द्यावरून मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती, असे  भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत असताना   तुकाराम मुंढे यांना तेथील महापौरांसह नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती पुण्यातील पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. मात्र, तिथेही त्यांना विरोध झाल्याने त्यांची मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराच्या आयुक्तपदी वर्णी  लावण्यात आली.