नाशिकमध्ये स्कार्फचा गळफास बसून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

152

नाशिक, दि. २४ (पीसीबी) – झोळीमध्ये झोपलेल्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीला स्कार्फचा गळफास बसल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२३) दुपाच्या सुमारास नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगरच्या समर्थ रेसिडन्सीमध्ये घडली.

आराध्या खाडपे असे स्कार्फचा गळफास बसून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश खाडपे आपली पत्नी आणि नऊ महिन्यांच्या आराध्यासह नाशिकच्या सातपूर येथे भाड्याच्या खोलीत राहतात. सोमवारी दुपारच्या सुमारास आराध्याला झोळीमध्ये झोपवून आई मनीषा खडपे या घरातील कामे करत होत्या. आराध्या झोपेत खाली पडू नये म्हणून त्यांनी काळजीपोटी झोळीला स्कार्फ बांधला होता. मात्र अचानक झोपेत खाली सरकत आलेल्या आरध्याला स्कार्फचा गळफास बसला आणि तिचा दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.