नाशिकमध्ये एसटी बस क्रूझर गाडीची समोरासमोर धडक; ६ जण ठार

124

नाशिक, दि. २३ (पीसीबी) – नाशिक  जिल्ह्यातील चांदवडजवळ एसटी बस आणि क्रूझर गाडीचा आज (शनिवार) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ६ प्रवाशी ठार झाले आहेत. तर, ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवले आहे.

क्रूझर गाडी बागलाण तालुक्यातील किकवारी येथील असून सर्वजण एका विवाह सोहळ्यासाठी जात होते. पिंपळगाव आणि चांदवड दरम्यान ही गाडी एका एसटी बसला समोरून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर गाडीचा चक्काचूर झाला. एसटीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.