नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोना

156

नाशिक,दि. ३० (पीसीबी) : राज्यातील राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होताना आढळले. दोन मंत्रीही कोरोनाच्या कचाट्यात आले. मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जितेंद्र आव्हाडांनी कोरोनावर मात केली आहे, तर अशोक चव्हाण यांच्यावर उपचार सुरु आहेत. यानंतर आता नाशिकच्या एका आमदाराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे.

आमदारांसह त्यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आमदाराच्या कुटुंबातील काहीजण मुंबईला नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. बहीण आणि मुलगी यांचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील आमदारांचा अहवालही गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. आमदारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कालपर्यंत 1074 वर पोहोचली. मालेगावात सर्वाधिक रुग्ण आहेत. नाशिक शहरात गुरुवारी दिवसभरात 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे शहराची रुग्णसंख्या 152 वर पोहोचली आहे.

WhatsAppShare