नाशिकचे प्रश्न सुटणार असतील, तर खुशाल माझी बदली करा – तुकाराम मुंढे

93

नाशिक, दि. २८ (पीसीबी) – माझी बदली करून जर नाशिकचे प्रश्न सुटणार असतील, तर खुशाल माझी बदली करावी, अशी प्रतिक्रिया नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपने मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर मुंढे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.