नाशिकचा दत्तक बाप कुठे गेला ?; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना उपहासात्मक सवाल  

255

नाशिक, दि. ३ (पीसीबी) – नाशिकचा दत्तक बाप कुठे गेला? असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक घोषणेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली. धुळे येथून रविवारी रात्री नाशिकला मुक्कामी आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी शासकीय विश्रामगृहावर  संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी नाशिकच्या विविध प्रश्नांची जंत्री त्यांच्यासमोर ठेवली.   

यावेळी राज ठाकरे यांनी प्रत्येक वेळेस मीच बोलायचे का? असे सांगत तुम्ही बोला असे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या. एकलहरे येथील प्रकल्प विदर्भात हलवला जात आहे. आतापर्यंत सर्वांनी विरोध केला. पण, मनसेने विरोध केला तर हा प्रकल्प हलवला जाणार नाही. यामुळे अनेकांचा रोजगाराचा प्रश्नही सुटेल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

त्यावर राज ठाकरे यांनी मात्र मौन पत्करले. गेल्या पाच वर्षांत मनसेने महापालिकेत अनेक विकासकामे केली. पण, आता काहीच कामे होत नाहीत. अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत राज ठाकरे यांना लक्ष घालण्याची विनंती केली