नाशकात धारदार शस्त्राने वार करुन एकाची निघृर्ण हत्या

96

नाशिक, दि. ११ (पीसीबी) – पंचवटीतील रामवाडी आदर्श नगर परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली.
किशोर रमेश नागरे (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार किशोर नागरे हा गुणाजी जाधव खून खटल्यात मुख्य साक्षीदार होता यामुळे त्याचा खून झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.