नाल्यात पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

68

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मानखुर्दजवळील चिता कँम्प येथील नाल्यात पडून एका २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली.

अरिहंत परवेज तांबोळी (वय २, रा. मानखुर्द) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी चिता कॅम्पमध्ये एम. जे. मार्गावर मल्लिक ज्वेलर्ससमोरील नाल्यात अरिहंत खेळत असताना नाल्यात पडला.  घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत फारच उशीर झाला होता. अरिहंतला नाल्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शताब्दी हॉस्पिटलचे डॉक्टर अरिहंतला मृत घोषित केले.