नालासोपारा स्फोटके प्रकरण: साकळी येथून अटक करण्यात आलेल्या दोघांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

80

यावल, दि. ९ (पीसीबी) – साकळी ता. यावल (जि. जळगाव) येथून नालासोपारा स्फोटके प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी व विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी या दोघांना आज (रविवार) मुंबई न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

एटीएसने सूर्यवंशी व लोधी यांच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, पेनड्राइव्ह, मोबाइल असे साहित्य जप्त केल्याचे न्यायालयात सांगितले. आज (रविवार) दुपारी त्यांना न्यायलायात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्या दोघांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आजवर या दोघांना कोणत्या गुन्ह्यात ताब्यात घेतले याची माहिती कुणालाच एटीएसच्या पथकाने दिली नव्हती. मात्र, आता या दोघांना नालासोपारा स्फोटकेप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या पाच जणांकडून मिळालेल्या माहितीवरून अटक केल्याचे स्पष्ट झाले आहे.