नालासोपारा, सोलापूर, सातारा, पुण्यात घातपाताचा कट उघड; दोघांना अटक

510

पुणे, दि. १० (पीसीबी) – नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथून सनातन संस्थेचा कथित साधक वैभव राऊतच्या मुसक्या आवळल्यानंतर आणखी दोन जणांना एटीएसने अटक केली आहे. या दोघांपैकी एकाला नालासोपारा तर दुसऱ्याला पुण्यातून अटक केली आहे.

आज (शुक्रवारी) पहाटे वैभव राऊतला अटक केली. त्याच्याकडून आठ देशी बॉम्ब, गन पावडर आणि डिटोनेटरचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला. या अटकेनंतर एटीएसने त्याची कसून चौकशी केल्यानंतर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. शरद काळसकर आणि सुधनवा गोंधळकर अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही राऊतच्या संपर्कात होते. गावठी बॉम्ब बनविण्यासाठी या दोघांनी राऊतला मदत केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या दोघांना अटक केल्यानंतर राऊत राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात येणार आहेत. दोन ते तीन महिन्यापूर्वीपासूनचे हे फुटेज तपासण्यात येणार आहेत. त्यातून राऊतच्या घरी कोणाचे येणे-जाणे होते. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, याची माहिती उजेडात येणार असल्याचे एटीएसने सांगितले. या दोघांव्यतिरिक्त राऊतच्या संपर्कात आणखी कोणी होते का? याचाही तपास करण्यात येणार आहे.