नारायण राणेंनी माझे राजकीय अस्तित्व संपवले – शंकर कांबळी

161

सिंधुदुर्ग, दि. १५ (पीसीबी) – माझे राजकीय अस्तित्व माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख  नारायण राणे यांनी संपवले, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार  शंकर कांबळी यांनी केला . तसेच राणेंच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडून मी फार मोठी चूक केली होती, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात युतीच्या प्रचार सभेत बोलत होते.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. मात्र, त्यांच्याशी गद्दारी करत राणे सेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसवासी झाले. परंतु त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा सर्वांवरच टीका केली, असे कांबळी  म्हणाले.

आज जी चूक मी केली, ती कोणीही करु नये. राणे सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याच मालकीचा असल्याच्या आविर्भावाने वावरत आहेत. नारायण राणेंना साथ देऊन मी मूर्खपणा केला आहे.  त्यांना वाटायला लागले खरी शिवसेनेची ताकद मीच. मी पक्ष हाताळणार. त्यावेळी राणेंचे मनसुबे उधळून लावले.  तरीही राणेंनी २१ आमदार फोडले. त्यामध्ये  मी एक होतो, तोच माझा मूर्खपणा ठरला’ अशी खंत  कांबळी यांनी व्यक्त केली.