नायडू हॉस्पिटल स्थलांतर प्रस्ताव रद्द करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

4

पुणे,दि.१९(पीसीबी) – सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी सोय असल्याने नायडू रुग्णालय बाणेर येथे स्थलांतर करू नका या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली.त्या संदर्भात एक लेखी निवेदन जिल्हा नायडू हॉस्पिटल हे सर्वसामान्य झोपडपट्टी मध्यमवर्गीय गरजू गरीब लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणारे पुणे शहरातील जागतिक पातळीवर ओळखले जाणारे हॉस्पिटल आहे.

शिवाय नायडू हॉस्पिटलची आरोग्य सुविधा पुरविण्याची १२० वर्षांपेक्षा जास्त ऐतिहासिक गौरवशाली परंपरा आहे. ज्या हॉस्पिटलने प्लेग सारखे रोगाची महामारीत संशोधन करून पुणेकरांना वाचविले व पुण्याची ओळख जागतिक पातळीवर निर्माण केली व सध्या कोरोना या महामारीत अतिशय चांगली कामगिरी बजावली आहे. आता अशा नायडू हॉस्पिटलला बाणेर याठिकाणी स्थलांतर करण्याचा डाव काही राज्यकर्त्यांनी सुरू केल्याच्या माहिती पुढे आली आहे.

नायडू हॉस्पिटलच्या 28 एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र पुणे शहराच्या मुख्य सिटी मध्ये असलेल्या 200 पेक्षा जास्त झोपडपट्टीधारकांना सहज हॉस्पिटल पर्यंत जाण्याची सुविधा असलेल्या नायडू हॉस्पिटलला स्थलांतर करू नका, अशी मागणी निदर्शकांनी केली. उद्या होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांनी याचा विरोध करावा याकरिता आज नायडू हॉस्पिटल बचाव कृती समितीच्या वतीने राजेश देशमुख जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष सागाई राजेश नायर, साबीर शेख तोफखाना, सलीम शेख, साबिर सय्यद, जमीर मोमीन, अमजद शेख, अशोक माने, आयटी शेख, राजेश नायर, मौलाना शकील, समीर शेख उपस्थित होते.

WhatsAppShare