नाना पटोले झाले आता पिंपरी चिंचवडचे सोयरे

1225

– उद्योजक शंकर काळभोर यांचे चिरंजीव रोहन यांच्या बरोबर निता पटोले यांचे शुभमंगल

पिंपरी, दि.१ (पीसीबी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आता उद्योगनगरी पिंपरी चिंचवडचे सोयरे झाले आहेत. पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते आणि उद्योजक शंकर नामदेव काळभोर यांचे चिरंजीव रोहन आणि पटोले यांची जेष्ठ कन्या निता यांचा शुभविवाह आज (बुधवारी) बावधान येथील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे दुपारी विधीवत संपन्न झाला. वधू-वर दोघेही उच्चशिक्षित आहेत.

या विवाहाच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह अशोक चव्हाण, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, धिरज देशमुख, शंभुराजे देसाई, भाई जगताप, यांच्यासह महाआघाडी सरकारमधील अर्धे मंत्रीगण, खासदार, आमदार तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल, रणजितसिंह सुरजेवाला आणि काँग्रेसचे केंद्रीय नेतेगण उपस्थित होते. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे अनेक मान्यवर उपस्थित राहू शकले नाहीत.