नातेवाईकांकडे जाणं पडलं महागात…कस ते पहा

0

पिंपरी, दि. 8 (पीसीबी) : रस्त्याने जात असलेल्या नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावण्याच्या दोन घटना चिंचवड आणि पिंपरी येथे उघडकीस आल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 7) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

विशाल संदीपान गायकवाड (वय 34, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी गायकवाड आणि त्यांचे नातेवाईक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता नेहरूनगर चौकातून पायी चालत जात होते. त्यावेळी  चोरट्यांनी गायकवाड यांच्या नातेवाईक व्यक्तीच्या हातातून 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.

अमोलसिंग गोकुळसिंग चव्हाण (वय 40, रा. चिखली प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चव्हाण बुधवारी (दि. 6) रात्री साडेदहा वाजता संभाजीनगर, चिंचवड मधील एकता हाऊसिंग सोसायटी समोरून जात असताना पल्सर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातून सात हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare