नागरिकांच्या खिशाला कात्री, घरगुती गॅस सिलेंडर महागला

323

नवी दिल्ली, दि.१ (पीसीबी) – सर्वसामान्य नागरिकांचा खिसा आता आणखी खाली होणार आहे, कारण विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये ३५.५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरही महाग झाले असून, १.७६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

जीएसटीमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे. १.७६ रुपयांनी महाग झाल्याने ४९६.२६ रुपयांवरून घरगुती अनुदानित गॅसची किंमत ४९८.०२ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून या नव्या किंमती लागून होतील.

यापूर्वी १ जुलै रोजी गॅसचे दर २.७१ रुपयांनी वाढवण्यात आले होते. दर महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या किमतीचा आढावा घेऊन दरामध्ये बदल केला जातो.