नागपूरात क्रेनने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

211

नागपूर, दि. १४ (पीसीबी) – क्रेनने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तीन विद्यार्थिनींचा नागपूरमधील अंबाझरी टी पॉईंटवर भीषण अपघात होऊन मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

श्रुती बनवारी, स्नेहा अंबाडकर आणि रुचिका बोरीकर असे मृत तरुणींची नावे असून त्या तिघीही रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी टी पॉईंट इथे मेट्रोचे काम सुरु आहे. या कामामुळे आजूबाजूचा परिसर अरुंद झाला असून रस्त्यावर खड्डेही प्रचंड झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास तिथे असलेली क्रेन क्लिनरशिवाय रिव्हर्स येत होती. तर तीन तरुणी अॅक्टिव्हावरुन ट्रिपल सीट येत होत्या. यावेळी वेगाने मागे आलेल्या क्रेनने अॅटिव्हाला जोरदार धडक दिली आणि तिन्ही तरुणी क्रेनच्या खाली आल्या. यात अॅक्टिव्हावरील दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणीने वोकहार्ट रुग्णालयात प्राण सोडले. पोलिस घटनास्थळी दाखल असून, त्यांनी क्रेन ताब्यात घेतली आहे.