नागपुरात आमदार निवासात शिवसेना आमदारांच्या स्वीय सहाय्यकाचा मृत्यू

41

नागपूर, दि. ३ (पीसीबी) – नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवार (दि.४) पासून सुरू होत आहे. मात्र, आमदार निवास भवनात आज (मंगळवार) सकाळी एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती ही अंधेरी(पूर्व) मतदारसंघांचे शिवसेना आमदार रमेश लटके यांची स्वीय सहाय्यक असल्याचे सांगितले जात आहे.

विनोद अग्रवाल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आमदार निवास भवनातील ४३ क्रमांकाच्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. रमेश लटके हे मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे.