नांदेडमध्ये मराठा आंदोलकांचा पोलिसांवर दगडफेक; सहा पोलिस जखमी

89

नांदेड, दि. २७ (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज (शुक्रवार) नांदेड येथील पुणेगाव व आमदुरा येथील कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा केली होती. यामुळे नांदेड पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

पोलिसांनी या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्त्याला पोहचून न दिल्याने संतप्त  जमावाने पोलिसांच्या तीन गाड्यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकारामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी फायर रबर गोळ्यांचा पाचवेळा गोळीबार करुन जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याचाही वापर करण्यात आला. पोलिसांनी आता पर्यंत वीस जणांना ताब्यात घेतले आहे.