नांदेडमध्ये जयंती साजरी केल्यामुळे तरुणाची निर्घृण हत्या

0
380

नांदेड ,दि.०३ (पीसीबी) – नांदेडमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नांदेडमध्ये वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार हवेली गावात ही घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार हवेली गावात वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाला आहे.एका गटाच्या सात जणांनी दुसऱ्या गटाच्या एका युवकावर चाकू आणि धारदार शस्त्राने वार केले. यात २३ वर्षीय अक्षय भालेराव या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हत्या आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सात आरोपीना अटक केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गावात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बोंडार हवेली गावात झालेल्या हाणामारीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावात रात्री झालेल्या दगडफेकीत काही वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.या सर्व घटनेचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. या प्रकरणी काही जण सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार हवेली गावात वरात सुरू होती. या गावात वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एका गटाच्या सात जणांनी दुसऱ्या गटावर शस्त्राने हल्ले केले. यावेळी दगडफेकीची देखील घटना घडली.

या हल्ल्यात एका गटातील २३ वर्षीय अक्षय भालेराव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. सध्या या गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. या प्रकरणी हत्या आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सात आरोपीना अटक केली आहे.