नवी सांगवी येथे गुन्हे शाखेची गुटखा विक्री प्रकरणी कारवाई

55

नवी सांगवी, दि. १८ (पीसीबी) – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारने शनिवारी (दि. 17) दुपारी नवी सांगवी येथे केली.

पंडित रामेश्वर शेळके (वय 29 रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, कस्पटे वस्ती, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कर्मचारी सुखदेव सूर्यभान गावंडे यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची नवी सांगवी येथे एकजण विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून 14 हजार 840 रुपयांचा गुटखा जप्त केला. काटेपुरम चौक नवी सांगवी येथे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare