महात्मा फुले जयंतीनिमित्त पिंपरी- चिंचवड शहर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने नवी सांगवीतील फेमस चौक, शिवनेरी चौक, राजमाता गार्डन येथे पदयात्रा काढण्यात आली. यावेळी स्त्री -पुरुष समानता, कविता, घोषवाक्ये तसेच स्पीकरद्वारे जनजागृती करण्यात आली.

या पदयात्रेत लहान मुलांचाही सहभाग होता. यावेळी संस्थापक अध्यक्ष विलास कुचेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष डॉ. अभिषेक हरिदास, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, विलास शहाणे, महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लालबिगे, अँड सचिन काळे आदी उपस्थित होते.

जात, धर्म, लिंग, पंथ असे भेदभाव कमी करून सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. सामाजिक न्यायबुद्धीने सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे, शिक्षण हाच परिवर्तनाचा मार्ग आहे, शिक्षणाचा अधिकार हा मानवी अधिकार आहे, असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी केले.