नवी सांगवीत प्रियकराच्या साथीने मुलीची आईला मारहाण; प्रियकरासह मुलीला अटक

685

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – तुला बघून घेते म्हणत पैशाच्या वादातून मुलीने प्रियकराच्या साथीने आईला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि. २२) दुपारी अडीचच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

संतोष भारत तायडे (वय २४, रा. आंबेडकरनगर, विक्रोळी, मुंबई) आणि तृप्ती तायडे यांना असे अटक करण्यात आलेल्या प्रियकर आणि मुलीचे नावे आहे. याप्रकरणी ४३ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्ती तायडे ही फिर्यादी यांची मुलगी आहे. तृप्ती ही तिचा प्रियकर संतोष तायडे याच्या बरोबर राहते. शुक्रवारी (दि. २२) तृप्ती तिचा प्रियकर संतोष याला घेऊन सांगवीत आईकडे आली होती. तृप्ती व तिच्या आईचा पैशावरून वाद झाल्याने त्यांच्यात भांडण झाले.  यावेळी तृप्तीने तिच्या आईला ‘तुला बघून घेते’ असे म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

तर आरोपी संतोषने तृप्तीच्या आईला मी ‘पीएसआय’ आहे, असे सांगून शिवीगाळ करत त्यांचा हात धरला. या प्रकरणी तृप्ती आणि तिच्या प्रियकराला सांगवी पोलिसांनी अटक केली आहेत. सांगवी पोलिस तपास करत आहेत.