नवी सांगवीत दोन लाखांची घरफोडी; रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

117

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – घराचा दरवाजा कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील १ लाखांची रोख रक्कम, सोन्याचा नेकलेस आणि सोन्याची चेन असा एकूण १ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.२२) सकाळी साडेसात ते रविवारी (दि.२३) सकाळी नऊच्या दरम्यान ६३३/९, समतानगर, सोनाली सुपर मार्केटजवळ नवी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी समीर अजीजभाई मोदी (वय ३५, रा. ६३३/९, समतानगर, सोनाली सुपर मार्केटजवळ नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२२) सकाळी साडेसात ते रविवारी (दि.२३) सकाळी नऊच्या दरम्यान फिर्यादी समीर यांचे राहते घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरातील १ लाखांची रोख रक्कम, सोन्याचा नेकलेस आणि सोन्याची चेन असा एकूण १ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक एस.ए.निकुंभ चोरट्यांचा शोध घेत आहेत.