नवी सांगवीत उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

133

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखा, कलारंग प्रतिष्ठान आणि सिध्दीविनायक ग्रुपच्या वतीने प्रसिध्द गायक उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहामध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार हृद्यनाथ मंगेशकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि मुख्य संयोजक भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.