नवी सांगवीत आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुढी उभारणार

60

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) –  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज (मंगळवार) रात्री १२ वाजता  नवी सांगवीतील साई चौकात भव्य दिव्य शिवराज्याभिषेकाची गुढी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक नवनाथ जगताप यांनी दिली.  

बुधवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजता शिव कीर्तनकार प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हल  यांचे शिवकीर्तन होणार आहे. या शिव कीर्तनातून भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा साकारण्यात येणार आहे.

यावेळी नागरिकांनी आणि शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नवनाथ जगताप यांनी केले आहे.