नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; १३ नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर

156

नवी मुंबई, दि, १९ (पीसीबी) – काँग्रेस राष्ट्रवादी मधून आऊटगोंईग चालूच आहे.  नवीन मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादीच अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

नवी मुंबई हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक प्रतिनिधी भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा एक गट भाजप प्रवेशासाठी बैठकांवर बैठका घेत असुन ते १५ ऑगस्टपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.