नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा

202

नवी मुंबई, दि. २१ (पीसीबी) – नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी  फार्म हाऊसवर नेऊन आपला विनयभंग केल्याचा आरोप १९ वर्षीय तरुणीने केला आहे. या प्रकरणी भगत यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव भगत यांची कामानिमित्त भेट घेण्यासाठी आपण उरण तालुक्यात असलेल्या दिघोडेमधील फार्म हाऊसवर गेलो होतो. मात्र, तिथे गेल्यावर त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार तरुणीने केला आहे.

नामदेव भगत हे नवी मुंबईतील नेरुळमधून शिवसेनेचे नगरसेवक आहेत. तसेच ते  स्थायी समिती सदस्य आहेत. ते काही वर्षांपूर्वी सिडको संचालकपदवर कार्यरत होते.  दरम्यान, पोलिसांनी नामदेव भगत यांच्याविरोधात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली   नाही.