नवीन घर घेण्यासाठी 50 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

81

वाकड, दि. १२ (पीसीबी) – सासरच्या लोकांनी विवाहितेकडे नवीन घर घेण्यासाठी 50 लाख रुपयांची वारंवार मागणी केली. त्यासाठी नकार दिला असता तिला घ्रास्फोट देण्याची धमकी देऊन तिचा छळ करण्यात आला. ही घटना 5 नोव्हेंबर 2017 ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत रहाटणी, चिखली येथे घडली.

कुणाल किरण वाघमारे (वय 33), सासरे किरण आबाजी वाघमारे (वय 62), सासू (वय 60, तिघे रा. रामदासनगर, चिखली), नणंद (वय 36, रा. चिंचोली, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना घरगुती कारणावरून त्रास दिला. तसेच नवीन घर घेण्यासाठी 50 लाख रुपयांची वारंवार मागणी केली. पैसे देण्यास विवाहितेने नकार दिला साता आरोपींनी तिला घटस्फोट देण्याची धमकी देऊन वारंवार शिवीगाळ मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare