नवाज शरीफला तुरुंगात भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मुलीला अटक

115

लाहोर, दि. ८ (पीसीबी) –  भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना तुरुंगात भेटण्यासाठी गेलेली त्यांची मुलगी मरियम नवाज शरीफ (वय ४५) यांना अटक करण्यात आली आहे.

लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात मरियम या आज (गुरुवार) त्यांचे वडील नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी आल्या असता नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरोच्या (नॅब) अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. मरियम यांना चौधरी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी अटक केल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. मरियम या “नॅब’च्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत होत्या आणि “नॅब’च्या कार्यालयात हजर राहण्याच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून त्या कोट लखपतमध्ये आल्या होत्या, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मरियम यांनी कालच पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती.