नऱ्हेत ट्रकखाली चिरडल्या गेल्याने दुचाकी वरील दोघांचा मृत्यू

299

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – भरधाव ट्रकच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यु झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.३०) रात्री साडेबाराच्या सुमारास नऱ्हे पुलाजवळ घडली.

संतोष छगन मेहेर ( वय २२, रा. रोपडे (क), ता माढा, सोलापुर) व स्वप्नील सुनिल देशमुख ( वय २२, रा. चाकण, खेड ) असे या अपघातात मृत्यु झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक उमेश नाना जावळ ( वय ४१, रा मु पो मेढा ता जावळी जि सातारा) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष व स्वप्नील हे दोघे त्यांच्या दुचाकीवरुन सोमवारी रात्री साडे बारा वाजता जात होते. नऱ्हे येथील भुमकर पुलाजवळील सेवा रस्त्यावर आले असताना पाठीमागुन भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच/११/एएल/४३८) दुचाकीला पाठीमागुन धडक दिली. जोरदार धडक बसल्याने दुचाकी ट्रकच्या पुढ़ील चाकाखाली आली. त्यामध्ये संतोष व स्वप्निल दोघेही चिरडले गेले. या घटनेनंतर सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर चालक उमेश जावळ यास अटक केली. सिंहगड पोलिस तपास करत आहेत.