नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा

90

वॉशिंग्टन, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय भेटींच्या मालिकेदरम्यान गुरुवारी दुसरी बैठक अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत केली.

• कमला हॅरिस यांच्यासोबतच्या या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी करोनाच्या महामारीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी अमेरिकीचे मनापासून आभार व्यक्त केले.

• मोदी आणि कमला हॅरिस या दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये खाजगीत चर्चा झाली आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीला उपस्थिती लावली.

• पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रणही दिले आहे. “भारताचे लोक तुमचे स्वागत करण्याची वाट पाहत आहेत. मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि देशाला दहशतवादी गटांचे समर्थन थांबवण्यास सांगितले आहे.

• कमला हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हॅरिस यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही.

• “उपराष्ट्रपती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. भारत कोविडशी लढत असताना एकदा संभाषण झाले होते. त्यावेळी कमला हॅरिस यांचे एकतेच शब्द मला आठवले. अमेरिकन सरकार आणि कंपन्या आणि परदेशातील भारतीय समुदाय कोविड महामारीशी अत्यंत कठीण लढाईत खूप मदत करत आहेत,” असं मोदी म्हणाले.

WhatsAppShare