नणंदेच्या लग्नासाठी माहेरहून पैसे न आणल्याने तलाक… तलाक… तलाक…

104

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – नणंदेच्या लग्नासाठी विवाहितेने माहेरहून पैसे न आणल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने विवाहितेला तीन तलाक देऊन माहेरी हाकलून दिले. हा प्रकार 29 एप्रिल 2018 ते 13 मे 2023 या कालावधीत पिंपरी येथे घडला.

अकीब आसिफ खान (वय 31), आसिफ अब्दुल्ला खान वय 62 आणि तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या नणंदेच्या लग्नासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत अशी आरोपींनी मागणी केली. ते पैसे न आणल्याने फिर्यादी यांना आरोपींनी मानसिक व शारीरिक त्रास दिला. आरोपी पतीने विवाहितेला तीन वेळा तलाक बोलून तलाक देत माहेरी हाकलून दिले. तसेच फिर्यादी यांच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.