नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेचा विनयभंग

610

रहाटणी, दि. ९ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलवरुन नग्न व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड केला, हे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा विनयभंग केला आहे. 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान रहाटणी येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी पिडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव अरविंद पांचाळ (रा. वडोदरा, गुजरात) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलवरुन महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. हे फोटो आरोपीने महिलेला ई-मेलवर व तिच्या पतीला मोबाईलवर पाठविले. तसेच, आरोपीने महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.