नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना पुत्रशोक

251

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांचे ज्येष्ठ पुत्र कौशिक राजू धर (वय १५) याचा आज (गुरुवार) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कौशिक हा आकुर्डीतील एसबी पाटील शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. बुधवार (दि.६) सायंकाळी सातच्या सुमारास त्याने थेरगाव येथील राहत्या घरात गळफास घेतला होता. मात्र त्याला तातडीने चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तो बऱ्याच दिवसांपासून बेशुध्द अवस्थेत होता. त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार परिक्षेत अपयश आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.