नगरसेविका आशा शेंडगे यांच्या समर्थनार्थ पिंपरीत धनगर समाज एकटवला

124

पिंपरी,दि. १५(पीसीबी) – नगरसेविका आशा शेंडगे यांच्यावरील कारवाई केवळ सूडबुद्धीने केली असून त्या धनगर समाजाच्या आहेत म्हणून त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत पिंपरी, मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यासमोर सकल धनगर समाजाच्या वतीने कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आयुक्तांच्या फलकावर शाई फेकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत नगरसेविका आशा शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार त्यांच्यासह अन्य साथीदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वारंवार सांगून देखील चुकीची कामे होत असतील आणि नागरिकांच्या हितासाठी व प्रभागाच्या विकासासाठी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणे चुकीचे आहे का असा सवाल करत आम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाज म्हणून एकत्र आलो असून या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत असल्याच्या भावना यावेळी धनगर समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी काळूराम कवितके, अजय दुधभाते, भरत महानवर, राजू घोडके, महावीर काळे, संतोष पांढरे, गणेश पाडुळे, मनोज मारकड, बंडू मारकड, सुनील बनसोडे, संजय नाईकवाडे, राहुल मदने, अक्षय वायकुळे, दादा कोपनर, गणेश खरात, पांडुरंग माने, कुंदन अनुसे, देवा पाडोळे, शंकर दातीर, मारुती खडके, सुरेश गायकवाड, संजय कवितके यांच्यासह आदी उपस्थित होते.

WhatsAppShare