नगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख

0
26694

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – मी औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात असतो, तर एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांना मी सांगू इच्छुतो की, तुम्हाला जर सय्यद मतीन सारख्या माणसांची पक्षासाठी  गरज वाटत असेल, तर तुम्ही सर्वजण पाकिस्तानात निघून जावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी सय्यद मतीन याचा निषेध केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज (सोमवार) आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी जावेद शेख यांनी सय्यद मतीन याचा जाहीर निषेध केला.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे सर्वधर्म समभाव मानणारे नेते होते. त्याच्या निधनानंतर त्यांना श्रध्दांजली वाहण्यास विरोध करणे म्हणजे देशद्रोहच आहे. मी अशा घटनेचा आणि एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यांचा जाहीर निषेध करतो, असे जावेद शेख म्हणाले.